आगीत पालघर विक्रीकर विभागाची कागदपत्रे जळून खाक

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या नंडोरेमधील गोदामाला भीषण आग लागली. आगीत पालघर विक्रीकर विभागाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

Updated: Mar 2, 2016, 08:54 AM IST
आगीत पालघर विक्रीकर विभागाची कागदपत्रे जळून खाक  title=

पालघर : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या नंडोरेमधील गोदामाला संध्याकाळी भीषण आग लागली. आगीत पालघर विक्रीकर विभागाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, ही आग लावली गेल्याचं दबक्या आवाजात बोललं जातंय. गोदामात कुठलाही विद्यूत पुरवठा नसल्यानं शॉर्ट सर्कीटची शक्यताही फेटाळण्यात येतेय. दरम्यान, आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलीस आणि अग्नीशमन दलाला माहिती दिली.

आग लागली त्या ठिकाणी कूठलाही सुरक्षा रक्षक किंवा व्यक्ती उपस्थित नव्हता.  आजू बाजूच्या रहिवाशांना ही आग दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पालघर नगरपरिषदेच्या एका अग्निशमन दलाच्या गाडीच्या मदतीने तब्बल तीन तासांनी आग आटोक्यात आणण्यात आली. 

 

तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाला यश आलं. गोदामात अन्नधान्याचा मोठा साठा होता. तो वाचवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलंय.