'खडसेंनी जागा दिली तर पंकजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री'

पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील,  असं वक्तव्य भाजप नेते विनोद तावडे यांनी केलंय. ते जळगाव जिल्यातील चाळीसगाव इथं झालेल्या एका जाहीर सभेत बोलत होते.  

Updated: Sep 13, 2014, 10:40 AM IST
'खडसेंनी जागा दिली तर पंकजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री' title=

जळगाव : पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील,  असं वक्तव्य भाजप नेते विनोद तावडे यांनी केलंय. ते जळगाव जिल्यातील चाळीसगाव इथं झालेल्या एका जाहीर सभेत बोलत होते.  

भाजप दिवंगत जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला चाळीसगावमधून सुरुवात झालीय.

मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या एकनाथ खडसे यांनाही टोला हाणायची संधी तावडे यांनी सोडली नाही. ‘पंकजाताईंसाठी खडसे यांनी जागा करून द्यावी’ असा चिमटा यावेळी त्यांनी खडसेंना काढला. संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्यात अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर दुस-या टप्प्यात चाळीसगावात या यात्रेत मोठी गर्दी उसळली होती. 

विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांत चढाओढ सुरू झालीय. त्यातच, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावल्याचं चित्र आहे. त्यामुळे, आत्तापासूनच भाजपअंतर्गत मुख्यमंत्रीपदाची रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.