व्हॉट्स अॅप, फेसबूकवर असे मॅसेज फॉरवर्ड केले तर पोलीस कारवाई

व्हॉट्स अॅप आणि फेसबूक वापरण्या-यांनो ही बातमी तुमच्यासाठी. सोशल मीडियावर पोलिसांची आता करडी नजर आहे. निवडणुकीबाबत तसेच  आचारसंहिता भंग करणारे मेसेज पाठविले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

Updated: Jan 26, 2017, 12:05 PM IST
व्हॉट्स अॅप, फेसबूकवर असे मॅसेज फॉरवर्ड केले तर पोलीस कारवाई

ठाणे : व्हॉट्स अॅप आणि फेसबूक वापरण्या-यांनो ही बातमी तुमच्यासाठी. सोशल मीडियावर पोलिसांची आता करडी नजर आहे. निवडणुकीबाबत तसेच  आचारसंहिता भंग करणारे मेसेज पाठविले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

व्हॉट्सअॅप आणि फेसबूकवर जर आचारसंहिता भंग करणारे मॅसेज तुम्ही फॉरवर्ड करत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुमच्या ग्रुपवरील पोलीस अधिकारी, पोलीस मित्र पोलिसांचा खबरी असू शकतो.

अपप्रचारावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक केलीय. तसेच अपप्रचाराबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतरही हे पथक कारवाई करणार आहे.

तर ठाण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाज 24 तास नाकाबंदी असणार आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर जर आचारसंहिता भंग करणारे मॅसेज तुम्ही फॉरवर्ड केले तर कावाई होऊ शकते, अशी माहिती पोलीस सह आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले.