पोलिसांनी महिला आणि शेतक-यांना झोडपले

सांगली जिल्ह्यातल्या खंबाळे गावात एमआयडीसीसाठी जबरदस्तीने जमिनीची मोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली.. यावेळी महिला आणि शेतक-यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली.खानापूर तालुक्यातील खंबाळे गावात एमआयडीसी मंजूर आहे. सुमारे पावणे पाचशे एकर जमीन या प्रकल्पात जाणार आहे.

Updated: Dec 8, 2013, 03:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सांगली
सांगली जिल्ह्यातल्या खंबाळे गावात एमआयडीसीसाठी जबरदस्तीने जमिनीची मोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली.. यावेळी महिला आणि शेतक-यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली.खानापूर तालुक्यातील खंबाळे गावात एमआयडीसी मंजूर आहे. सुमारे पावणे पाचशे एकर जमीन या प्रकल्पात जाणार आहे.
यात तीनशे अठ्ठ्याऐंशी एकर जमीन शेतक-यांच्या मालकीची असून पंच्याहत्तर एकर जमीन ही इनामी आहे. या जमिनीला लागून ताकारी कॅनाल असून टेंभू सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात ही जमीन आहे. तसंच या ठिकाणचा तलाव भरलाय..
वर्षानुवर्ष पाण्याची वाट बघत असलेल्या या शेतकर्याना आता कुठे पाणी मिळालंय..मात्र या ठिकाणी एमआयडीसी झाल्यास इथली शेती उद्ध्वस्त होणार आहे अशी शेतक-यांची तक्रार आहे. त्यामुळं त्यांनी न्यायालयात धाव घेऊन जमीन हस्तांतरणाला विरोध केला.
न्यायालयानंही शेतक-यांना विश्वासात घेऊन जमिनीची मोजणी करण्याचे आदेश दिले.. असं असतानाही शेतक-यांना पोलिस ठाण्यात बसवून परस्पर जमीन मोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली.. त्याला विरोध करणा-या महिला आणि शेतक-यांवर लाठीमार करण्यात आला.
केंद्र सरकारने नवा जमीन अधिग्रहण कायदा केलाय..८० टक्के शेतक-यांचा विरोध असल्यास जमीन अधिग्रहण करता येत नाही..मात्र याबाबत विचारलं असता याबाबतचा कोणताही लेखी आदेश आला नसल्याचं एमआयडीसीचे एरिया ऑफिसर शिवाजी साजणे यांनी सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.