खड्डयात गेले कल्याण-डोंबिवली

नेमेची येतो मग पावसाळा आणि त्याच बरोबर रस्त्यांवरील खड्डे सुद्धा...पावसाळा आणि खड्डे यांच अतूट अस समीकरण बघण्याची सवयच कल्याण डोंबिवलीकरांना झाली आहे...

Updated: Sep 1, 2015, 09:54 PM IST
खड्डयात गेले कल्याण-डोंबिवली title=

डोंबिवली : नेमेची येतो मग पावसाळा आणि त्याच बरोबर रस्त्यांवरील खड्डे सुद्धा...पावसाळा आणि खड्डे यांच अतूट अस समीकरण बघण्याची सवयच कल्याण डोंबिवलीकरांना झाली आहे...

मात्र या वेळी तितका जोरदार पाऊस  झाला नसूनही रस्त्यांना खड्डे मात्र पडले आहेत आणि ते ही इतक्या मोठ्या प्रमाणात की संपूर्ण कल्याण डोंबिवली जणू खड्ड्यात गेले की काय अशी शंका निर्माण यावी.. 

 

महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद रस्ते बनविण्यासाठी आणि रस्त्यात पडलेले खड्डे  बूजावण्यासाठी करते.. त्यातही शहरांतील रस्ते बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा विशेष निधीही प्राप्त झाला…

यंदा निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडूनही बहुतांश कल्याण डोंबिवली शहर आजही खड्ड्यातच आहे.. मग हा रस्त्यांच्या नावे खर्च झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी गेला कुठे??????… असा  संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत.. 

शहरातील डांबरी रस्त्यांची चाळणी झालेली असताना नव्याने बनविण्यात आलेल्या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांवरही खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच मोठा गाजवाजा करून आणि थाटामाटात या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले. त्यांची स्थिती सुद्धा लवकरच खराब झाली आहे. 

इतकाच काय पण महापालिकेचे आयुक्त ज्या भागात राहतात तिथल्या रस्त्यांची तर अक्षरशहा चालण झाळी आहे...आणि येथील रस्त्याचे काम दोन वर्ष झाले तरी अपूर्ण राहिल्याने परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे...त्यामुळे आम्हाला आता वाली कोण असा संतप्त सवाल कल्याण डोंबिवलीकर करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.