पुणे : पुण्यात बस ड्रायव्हर संतोष माने याने बेदरकारपणे एसटी चालवून अनेक गाड्या चिरडल्या होत्या. तसचा प्रकार पुन्हा एकदा येथे घडला. एका मद्यधुंद अवस्थेतील एका ट्रकचालकाने अनेक गाड्या उडवूत अनेकांना जखमी केले. या थराराने शिवाजीनगर येथे भिती पसरली होती. मात्र, पोलिसांनी जीव धोक्यात घालून ट्रक रोखला.
अधिक वाचा : सलमान खान २००२ हिट अॅन्ड रन प्रकरणी दोषी
शिवाजीनगर रस्त्यावर बेदरकारपणे ट्रक चालवित पुण्यामध्ये काल रात्री ११.३० ते १२.१५ च्या दरम्यान हे थरारनाट्य घडले. मद्यधुंद चालकाने अनेक वाहनांना धडक देण्याचा सपाट चालवला होता. अनेक नागरिकांना जखमी केले. त्याला अडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनालाही त्याने जोरदार धडक दिली. परंतु पोलिसांनी जीवाची परवा न करता त्याला रोखत त्याच्या मुसक्या आवळल्या.
वेळ रात्री ११.३० ची पुण्यातील शिवाजीनगर रस्त्यावर नेहमीपेक्षा वाहतूक अत्यंत कमी होती. परंतु वाहनांनाची ये जा मात्र सुरु होती. त्याच वेळी शनिवार वाड्याकडुन येणा-या एका ट्रक ने शिवाजीनगर रस्त्यावरील अनेक वाहनांना उडवायला सुरुवात केली. बेदरकारपणे गाडी चालवत हा ट्रक ड्रायव्हर शिवाजीनगर रस्त्याने तर कधी बाजीराव रस्त्याने पुढे जात होता. त्याचा वेग इतका होता की शिवाजी रस्त्यावरील दगडूशेठ मंदिरापुढील बॅरिगेट्स देखील या ट्रकचालकाने उडवून दिलेत. एवढेच नाही तर त्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांच्या गाडीलाही धडक दिली.
अधिक वाचा : मुंबईत जान्हवी गडकर प्रकरण
हडपसरवरुन पुण्यामध्ये येत असताना त्याने अनेक वाहनाना धड़क द्यायला सुरुवात केली. नागरिकांनी याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. पोलीस आणि नागरिक यांनी पाठलाग करुन ट्रकचालकाला ताब्यात घेतलं. जितेंद्र बसाइसिंग, या ट्रकचालकाचे नाव असून तो लखनऊवरुन ट्रक घेऊन पुण्याला आला होता. अपघातप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अधिक वाचा : तीन वर्षांपूर्वी संतोष मानेने केला होता अपघात
बेदरकारपणे ट्रक चालवून केलेल्या अपघातमुळे पुणेकरांना तीन वर्षांपूर्वी संतोष माने याने पुण्यात घडवलेल्या अपघातांची आठवण झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.