माजी मंत्री अनंतराव थोपटेंचा महिलांना मारहाणीचा प्रयत्न, कॅमेऱ्यात कैद

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटेंनी चक्क महिलांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. थोपटे यांच्या विरुद्ध महिलांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

Updated: Jun 18, 2015, 07:11 PM IST
माजी मंत्री अनंतराव थोपटेंचा महिलांना मारहाणीचा प्रयत्न, कॅमेऱ्यात कैद title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, भोर, पुणे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटेंनी चक्क महिलांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. थोपटे यांच्या विरुद्ध महिलांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

भोरमध्ये अनंतराव थोपटे आणि लिलावती तनपुरे यांच्या जमिनीच्या मालकीवरुन वाद आहे. त्यातूनच आज थोपटे घटनास्थळी गेले असता, तनपुरे कुटुंबातील महिलांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे संतप्त झालेल्या थोपटेंनी लिलावती तनपुरेंसह इतर महिलांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी लीलाबाई तनपुरे यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

थोपटे यांच्या ड्रायव्हरनं देखील या प्रकरणी तक्रार केली आहे. या महिला आणि काही लोकांनी गाडी अडवून तोडफोड केली. तसंच गाडीतील पैसे आणि वस्तू चोरल्याची तक्रार थोपटे यांनी केली आहे. 

भोर तालुक्यातील घांगवडीमध्ये ही घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. थोपटे आणि तनपुरे यांनी या प्रकरणी परस्परांच्या विरोधात आरोप केले आहेत. 

दरम्यान, हा सगळा प्रकार उपस्थित लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला. मात्र मोबाईलमध्ये शूटिंग होत असल्याचं लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी थोपटेंना बाजूला केलं.

पाहा व्हिडिओ -

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.