…हे आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात भ्रष्टाचारी शहर!

 लाचलूचपत विभागानं राज्यातील २१६ भ्रष्ट शहरांची यादी जाहीर केलीय. या यादीत पुण्यानं प्रथम क्रमांक पटकावलाय...

Updated: Dec 19, 2014, 12:21 PM IST
…हे आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात भ्रष्टाचारी शहर! title=

पुणे :  लाचलूचपत विभागानं राज्यातील २१६ भ्रष्ट शहरांची यादी जाहीर केलीय. या यादीत पुण्यानं प्रथम क्रमांक पटकावलाय...

या यादीत नाशिक शहराचा दुसरा क्रमांक, औरंगाबादचा तिसरा, ठाणे शहराचा चौथा तर मुंबईचा आठवा क्रमांक लागलाय. लाचलुचपत विभागाने सादर केलेल्या अहवालात सरकारी खात्यांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाराचाच्या नोंदी या महसूल विभागात झालेल्या आहेत.

राज्यातील भ्रष्ट शहरे
शहर अटक गुन्हा दाखल 
पुणे २१६ २१६ 
नाशिक २१० २०५ 
औरंगाबाद १६४ १५१ 
ठाणे  १५५ १४५ 
नागपूर १५४  १४५ 
अमरावती १३६ १२९ 
नांदेड १३४ १३१ 
मुंबई ९० ८० 

  

राज्यातील सर्वात भ्रष्ट खाती
खाते अटक गुन्हा दाखल
महसूल ४१० ३१२ 
पोलीस ४०० २८५ 
पंचायत समिती १२१  ९३ 
महानगर पालिका ९४  ५६
शिक्षण ७४ ५३

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.