'पुणे पालिकेचे ५.९१२ कोटींचे अंदाजपत्रक, बजेटमध्ये दुजाभाव'

महापालिकेचं चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल ५ हजार ९१२ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आहे. पण, विरोधक मात्र यावर समाधानी नाहीत. या बजेटमध्ये दुजाभाव झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे.

Updated: May 19, 2017, 12:26 PM IST
'पुणे पालिकेचे ५.९१२ कोटींचे अंदाजपत्रक, बजेटमध्ये दुजाभाव' title=

नितीन पाटणकर, पुणे : महापालिकेचं चालू आर्थिक वर्षासाठी तब्बल ५ हजार ९१२ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आहे. पण, विरोधक मात्र यावर समाधानी नाहीत. या बजेटमध्ये दुजाभाव झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे.

महापालिकेत स्पष्ट बहुमताने सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीचे पहिलेच अंदाजपत्रक मंजुरीसाठी सभागृहात आले आहे. ५ हजार ९१२ कोटी रुपयांचे हे बजेट आहे.  मात्र यामध्ये विरोधी पक्षांना कमी बजेट दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. याचा निषेध म्हणून सभागृहात काही नगरसेवक काळे कपडे परिधान करून आले होते. तर महिला नगरसेवकानी डोक्याला काळे कापड बांधले होते. 

सत्ताधारी भाजपाकडे १०१ नगरसेवकांचा ताफा असला तरी त्यातील बरेचसे नवीन आहेत. त्यामुळे अंदाजपत्रकाबाबत त्यांच्यातील अनेकजण गोंधळलेले आहेत. या नवीन नगरसेवकांना बजेटचा बचाव करता आला नाही. अखेर स्थायी समिती अध्यक्षानीच बजेटमध्ये सर्वाना समान निधी दिला असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणं देखील दिली.  

सबका साथ सबका विकास नारा देत देशात राज्यात आणि पुण्यातही भाजपने सत्ता काबीज केली. पण महापालिका बजेटमध्ये जनतेच्या कामासाठीच देण्यात येणाऱ्या बजेट दुजाभाव केला जात असल्याचा आरोप भाजपवर केला जातोय.