मुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा!

बरीच वाट पाहायला लावल्यानंतर महाराष्ट्रावर वरुण राजा प्रसन्न झालाय. अर्थातच शेतकऱ्यांसह सर्वांनाच याचा खूप आनंद झालाय... पण, तुमचा प्रवासाचा प्लान असेल तर मात्र या पावसाचा तुम्हाला फटका बसू शकतो.

Updated: Sep 19, 2015, 05:24 PM IST
मुंबई - पुणे हायवेवरून प्रवासाचा तुमचा प्लान असेल तर थांबा! title=

मुंबई : बरीच वाट पाहायला लावल्यानंतर महाराष्ट्रावर वरुण राजा प्रसन्न झालाय. अर्थातच शेतकऱ्यांसह सर्वांनाच याचा खूप आनंद झालाय... पण, तुमचा प्रवासाचा प्लान असेल तर मात्र या पावसाचा तुम्हाला फटका बसू शकतो.

पावसाचा जोर वाढल्यामुळे मुंबई - पुणे हायवेवर डोंगरावरचं पाणी धावून आलंय... रस्त्यावरच पाणी साचल्यामुळे अर्थातच त्याचा या मार्गावरील ट्राफिकला मात्र चांगलाच फटका बसलाय. 


१८ सप्टें २०१५, सायंकाळी ६ वा.

पुणे जिल्ह्यातील कामशेत, कान्हेफाटा, वडगाव, तळेगाव, साते या गावांमध्ये शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे मुंबई पुणे हायवेवर पाणी साठलंय. 

दरम्यान, कामशेत - वडगाव दरम्यान रेल्वेट्रॅकवरील खडी पावसाच्या पाण्यात वाहून गेलीत. त्यामुळे या मार्गावरची रेल्वेसेवाही बंद आहे. त्यामुळे, मुंबई - पुण्याच्या प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झालाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.