मुंबई, ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी!

लोकांना घामाच्या धारांत भिजवणारं ऊन जरासं बाजुला सारून पावसानं आज दुपारी पुन्हा एकदा हजेरी लावली. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पनवेल, पेण, रायगड या ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरींनी नागरिकांना सुखद धक्का दिला.

Updated: Nov 21, 2015, 06:58 PM IST
मुंबई, ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी! title=

मुंबई : लोकांना घामाच्या धारांत भिजवणारं ऊन जरासं बाजुला सारून पावसानं आज दुपारी पुन्हा एकदा हजेरी लावली. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पनवेल, पेण, रायगड या ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरींनी नागरिकांना सुखद धक्का दिला.

श्रीलंकेजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्याचा हा परिणाम असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे.मुंबईत हलकासा पाऊस पाहायला मिळाला असला तरी मुलुंड, ठाणे, नवी मुंबईत मात्र पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळाल्या. 

हवामानाचा अंदाज नोंदवणाऱ्या 'स्कायमेट'च्या म्हणण्यानुसार, आणखी दोन दिवस नागरिकांना रिमझिम पाऊस अनुभवायला मिळणार आहे. पावसामुळे हवेतही थोडा गारवा जाणवतोय. त्यामुळे, उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबई, ठाणेकरांना मात्र थोडा दिलासा मिळालाय. 

मुंबईमध्ये याआधी २६ ऑक्टोबरला पावसानं अशीच अचानक हजेरी लावली होती. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांला पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात, असा अंदाजही हवामान खात्यानं व्यक्त केलाय. त्यामुळे, नागपूर आणि नाशिककरही पावसाची वाट पाहत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.