रतन टाटा यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट

टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली.

Updated: Dec 28, 2016, 04:44 PM IST
रतन टाटा यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट

नागपूर : टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली.

एका कार्यक्रमासाठी रतन टाटा चंद्रपूरमध्ये आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय, देशातली चलनकोंडी आणि उद्योगक्षेत्रावर त्याचे उमटत असलेले पडसाद, या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.