रत्नागिरी : कुख्यात गुंड साहिल काळेसकर पोलिसांच्या ताब्यातून पळालाय.
दोन दिवसांपूर्वी साहिल काळसेकरला पोलिसांनी रत्नागिरीच्या एमआयडीसी परिसरातून अटक केली होती. अटकेवेळी साहिलने पोलिसांवरच हल्ला केला होता. त्यात दोन पोलीस गंभीर जखमीही झाले होते.
दोन दिवसांपूर्वी अटक केल्यानंतर साहील रत्नागिरीच्या सिव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलिसांच्या हातावर तुरी देवून साहिलने रुग्णालयातून पळ काढला.
याआधी, तीन वेळा साहील काळसेकर पोलिसांच्या तावडीतून पळालाय. एकूण २८ गुन्हे गंभीर गुन्हे साहील काळसेकरवर दाखल असून त्यामध्ये खून, दरोडे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
साहिलने न्यायालयातही न्यायाधीशांवरही सुनावणीवेळी चप्पल फेकली होती. तसचं अनेक लोकांवर हल्ला केल्याचे गुन्हे त्याच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. साहीलचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून विविध ठिकाणी सध्या त्याच शोध घेण्याचं काम सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.