सचिन तेंडुलकरने मूकबधीर-गतीमंदांना दिले ५० लाख

ज्यांना एकता येत नाही , बोलता येत नाही ...जे आपली व्यथाही निट मांडू शकत नाही अशा संगमनेर येथील मूकबधीर आणि गतीमंद शाळेतील मुलांची आर्त हाक ऐकली ती सचिन तेंडुलकरने.... 

Updated: Jan 5, 2016, 08:43 AM IST
सचिन तेंडुलकरने मूकबधीर-गतीमंदांना दिले ५० लाख  title=

शिर्डी : ज्यांना एकता येत नाही , बोलता येत नाही ...जे आपली व्यथाही निट मांडू शकत नाही अशा संगमनेर येथील मूकबधीर आणि गतीमंद शाळेतील मुलांची आर्त हाक ऐकली ती सचिन तेंडुलकरने.... 

केवळ एका साध्या प्रस्तावावर  सचिनने त्यांच्या नव्या निवासासाठी आपल्या खासदार निधीतून तब्बल ५० लाखांची भरिव मदत केलीय...

देशातील अनेक खासदारांना मिळणारा निधी पूर्णपणे वापरला जात नाही, असे आरोप होत आहेत. तर अशावेळी राजकारणाचा गंधही नसलेल्या तसेच राज्यसभेत खासदार म्हणून नेमणूक झालेल्या सचिन तेंडुलकरने आपल्या खासदार निधीतून दिलेल्या या रकमेमुळे  एक नवा आदर्श निर्माण केलाय...