अहमदनगर : नगराध्यक्ष निवडीप्रमाणे सरपंचनिवडही थेट जनतेतूनच व्हायला हरकत नाही, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
युती सरकार चुकीचे निर्णय घेत आहे. थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय राजकीय हेतूनेच असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
हा प्रयोग आघाडी सरकारने केला होता. त्या वेळी महापालिका क्षेत्रात दोन वॉर्डांचा आणि नगरपालिकांमध्ये चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्याची रचना केली. ती योग्यच होती. त्यात बदल होऊ नयेत. नगराध्यक्ष निवडीच्या कायद्यात योग्य तरतुदींची गरज असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.