शाळेत मुख्याध्यापकला दारू पिताना रंगेहात पकडले

शिर्डी जवळील निमगाववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मद्यपान करणाऱ्या एका मुख्याध्यापकाला पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. विलास शिंदे असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. 

Updated: Jan 19, 2016, 09:40 PM IST
शाळेत मुख्याध्यापकला दारू पिताना रंगेहात पकडले title=

अहमदनगर : शिर्डी जवळील निमगाववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मद्यपान करणाऱ्या एका मुख्याध्यापकाला पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. विलास शिंदे असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. शिर्डीजवळच्या निमगाववाडी जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडलाय. 

पोलिसांनी या महाशयांची वैद्यकीय चाचणी केली असता, त्यात त्यांनी मद्यप्राशन केल्याचं आढळून आलं. या मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय. शाळेच्या आवारात व्यसनं करणा-या शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनानं नुकतेच दिले होते. मात्र शिक्षक या आदेशाला गांभिर्यानं घेत नसल्याचं या घटनेतून दिसतंय

या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याची  मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. राज्य शासनाने नुकतेच शाळेत अथवा अवारत मद्यप्राशन करणाऱ्यावर कार्यवाही करन्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला कोणीच घाबरत नसल्याचे आजच्या घटनेवरुन उघडकीस आले आहे.