अल्पवयीन मुलींवर बलात्कार, नराधम अटकेत

दोन अल्पवयीन मुलींशी विकृत चाळे करणाऱ्या एका नराधमाला स्थानिक नागरिकांनी पकडून कापुरबावडी पोलिसांच्या हवाली केले आहे. हा व्यक्ती रखवालदार म्हणून काम करत होता. त्याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने हे कृत्य केल्याचे असे समोर आले होते आणि आज या दोघींवर या नराधमांनी बलात्कार केल्याचे कबुली दिले आणि सर्वच ठाणेच हादरले आहे.

Updated: Apr 8, 2015, 06:48 PM IST
अल्पवयीन मुलींवर बलात्कार, नराधम अटकेत title=

ठाणे : दोन अल्पवयीन मुलींशी विकृत चाळे करणाऱ्या एका नराधमाला स्थानिक नागरिकांनी पकडून कापुरबावडी पोलिसांच्या हवाली केले आहे. हा व्यक्ती रखवालदार म्हणून काम करत होता. त्याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने हे कृत्य केल्याचे असे समोर आले होते आणि आज या दोघींवर या नराधमांनी बलात्कार केल्याचे कबुली दिले आणि सर्वच ठाणेच हादरले आहे.

कोलशेत परिसरातील मरीआईनगर परिसरात यशोदीप ही इमारत आहे. या इमारतीत दत्ता इंदुलकर [३५] हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्याने मागील तीन दिवसांपासून या इमारतीच्या लगत असलेल्या एका सोसायटीतील एका सात आणि अकरा वर्षीय या दोन अल्पवयीन मुलीना आपल्या खोलीत नेले आणि  त्यांना चॉकलेट देण्याचे तसेच टीव्ही दाखवण्याचे आमिष दाखवून त्यांच्याशी विकृत चाळे करत होता. त्यानंतर तो या दोघींना चाकूचा धाक दाखवून हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. 

दरम्यान सोमवारी या दोन्ही मुलीनी हा प्रकार त्यांच्या आई वडिलांना सांगितला त्यानंतर त्यांनी स्थानिक नगरसेवक मधुकर पावशे यांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी दत्ता इंदुलकर याला नागरिकांच्या मदतीने पकडून कापूरबावडी पोलिसांच्या हवाली केले, प्रथम हा विनयभंगाचा प्रकार असावा असे दिसत होते. परंतु आज आरोपीने या दोन्ही चिमुरडीनवर बलात्कार केल्याचे कबुल केले. पोलिसांनी या नराधमाला ठाणे कोर्टात हजार केले असता कोर्टाने १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे ठाण्याचे डीसीपी विलास चंदनशिवे यांनी माहिती दिली. 

या नराधमावर कलम ३७६, महिला व बाल लैंगिक कायदा तसेच ५०६ (अ ),३५४,३४२ या कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे . 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.