कल्याण: भाजपाचे जेष्ठ नेते आणि एक उत्तम संसदपटू असलेले रामभाऊ कापसे यांचं आज पहाटे 4 वाजता निधन झालं. वयाच्या 82 व्या वर्षी कल्याणमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 11 वाजता रामभाऊंची अंत्ययात्रा निघणार आहे.
गेली दहा वर्ष रामभाऊ कापसे यांची तब्येत ठीक नसल्यानं ते राजकारणापासून दूर होते. त्यांना विस्मरणाचा आजर जडल्याचं डॉक्टरांचं म्हणणं होतं. रामभाऊ हे मनमिळाऊ, उत्तम संघटन, एक चांगला वक्ता, कार्यकर्ता म्हणून त्यांचा ख्याती होती.
1933 साली ठाणे जिल्यातील जव्हार इथं रामभाऊ कापसेंचा जन्म झाला. ठाणे मध्ये त्यांनी भाजपाचा जम बसवला. डोंबिवली लोकलसाठी त्यांनी पाठपुरावा करत आंदोलन केले.
ते रूपारेल कॉलेजमध्ये 1959 ते 1993पर्यंत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. कापसे 1996-98 च्या काळात राज्यसभेचे खासदार होते. ठाणे लोकसभाचे खासदार म्हणून कार्यरत होते. तर २००४-०६ मध्ये ते अंदमान - निकोबारचे नायब राज्ययपाल होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.