पवारांनी घेतली नरेंद्र मोदींच्या वक्तव्यांची फिरकी

 छातीच्या वक्तव्याचीही खिल्लीही उडवली. तर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नोटाबंदीवरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 5, 2017, 04:53 PM IST
पवारांनी घेतली नरेंद्र मोदींच्या वक्तव्यांची फिरकी

नाशिक : जिल्ह्यातल्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलतांना त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. 

जिल्हा बँकांमध्ये तब्बल आठ हजार सहाशे कोटी रुपये अडकले आहेत. या नोटा स्वीकारायला राष्ट्रीयकृत बॆंका तयार नाहीत. त्यांमुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

तसेच पंतप्रधानांच्या 56 इंच छातीच्या वक्तव्याचीही खिल्लीही उडवली. तर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नोटाबंदीवरून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती.