ठाण्यात शिवसेना-भाजप कार्यकर्ते, नेते भिडलेत

ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय राडा दिसून आला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आनंद साजरा करताना चक्क एकमेकांना भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Updated: Nov 12, 2014, 09:53 PM IST
ठाण्यात शिवसेना-भाजप कार्यकर्ते, नेते भिडलेत title=

ठाणे : ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय राडा दिसून आला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आनंद साजरा करताना चक्क एकमेकांना भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ठाण्यातले शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेते पदावर निवड झाल्यावर शिवसैनिकांनी पालिका मुख्यालयासमोर जल्लोष केला. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही बहुमत सिद्ध झाल्याबद्दल जल्लोष करायला सुरुवात केली. त्यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि आपापसांत भिडले.

त्यानंतर शिवसेना नगरसेवक आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पिटाळून लावलं. गेली अनेक वर्षं खांद्याला खांदा लावून काम करणारे कार्यकर्ते आज आपापसांत भिडल्याचं चित्र ठाण्यात दिसलं.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.