बुलडाणा : जिल्ह्य़ातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचे जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आमदारकी जाण्याची शक्यता आहे.
अकोला जात प्रमाणपत्र पडताळणी त्रिसदस्यीय समितीनं हा निर्णय दिलाय. रायमुलकर मेहकर या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदाससंघातून संजय रायमुलकर दुसर्यांदा विजयी झाले आहेत. ते सुतार जातीचे असतांना त्यांनी बलाई जातीचं प्रमाणपत्र घेतल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ :