तलवारीचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार

परभणीत बलात्काराचा धाक दाखवून बलात्कार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. तलवारीचा धाक दाखवून तरुणानं ३५ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्यात आला आहे.

Updated: Jul 21, 2016, 08:49 AM IST
तलवारीचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार title=

परभणी : परभणीत बलात्काराचा धाक दाखवून बलात्कार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. तलवारीचा धाक दाखवून तरुणानं ३५ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्यात आला आहे.

हा प्रकार महिलेनं तिच्या पतीला आणि नातेवाईकांना सांगितला, त्यानंतर प्रकरण उघडकीस आलं. पीडित महिलेच्या परिसरातच राहणाऱ्या तरुणानं रात्री तलवारीचा धाक दाखवला आणि, महिलेला शेजारच्या मैदानात नेल्यावर बलात्कार केला असल्याचं तक्रारीत सांगण्यात आलंय.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या आरोपीविरोधात बलात्कार, अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.