महाराष्ट्रात पुन्हा काका-पुतण्यात संघर्ष, तटकरेंचा पुतण्या शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Updated: Nov 6, 2016, 04:49 PM IST
महाराष्ट्रात पुन्हा काका-पुतण्यात संघर्ष, तटकरेंचा पुतण्या शिवसेनेत title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना भवनमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गिते, आमदार भरत गोगवले आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या दिवशीच सेनेत प्रवेश करायची इच्छा संदीप तटकरे यांनी व्यक्त केली होती, मात्र उद्धव ठाकरेंनी याला परवानगी दिली नसल्याची प्रतिक्रिया अनंत गितेंनी दिली.

लवकरच शेकापलाही आपण मोठा झटका देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे आता युती झालीय आणि पुढेही होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. तर आगामी आव्हानं पेलण्याची ताकद शिवसेनेत असल्याचं संदीप तटकरेंनी स्पष्ट केलं आहे. काकांना कोणताही संदेश द्यायचा नसल्याचंही संदीप तटकरेंनी स्पष्ट केलं आहे.