बारामती : राज्याच्या साखर पट्यांचं लक्ष लागून राहिलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सोमेश्वरमधील एका जागेवर राष्ट्रवादीचे किशोर भोसले निवडून आलेत. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यांनी जीव ओतून प्रचार केलाय. तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या काकडे गटांनंही जोरात प्रचार केलाय.
पवारांची या कारखान्यावर सलग बावीस वर्षे असलेली सत्ता उलथवून टाकण्यासाठी पवार विरोधक एकत्र आलेत. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, चंद्रराव काकडे अशा मातब्बरांनी या निवडणुकीसाठी सभा घेतल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.