केडीएमसी महापौर, उपमहापौर पदावर आज शिक्कामोर्तब

राज्याचे लक्ष असलेल्या कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज होत आहे. शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपच्या विक्रांत तरे किंवा विशाल पावशे यांची उपमहापौरपदी निवड होण्याचे संकेत मिळत आहेत.

Updated: Nov 11, 2015, 08:57 AM IST
केडीएमसी महापौर, उपमहापौर पदावर आज शिक्कामोर्तब title=

कल्याण : राज्याचे लक्ष असलेल्या कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज होत आहे. शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपच्या विक्रांत तरे किंवा विशाल पावशे यांची उपमहापौरपदी निवड होण्याचे संकेत मिळत आहेत.

महापौर-उपमहापौर पदाकरिता शिवसेना आणि भाजपाकडून स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेऊन बहुमताच्या बळावर निवडणूक जिंकण्याचा सेना-भाजप युतीचा प्रयत्न असणार आहे.

अधिक वाचा : ...तर केडीएमसीत शिवसेनेशिवाय आमची सत्ता होती  : मुख्यमंत्री

शिवसेना आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत शिवसेनेला प्रथम महापौरपद देऊन भाजपाने उपमहापौरपद स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केडीएमसीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना- भाजपा हे राज्यातील सत्ताधारी पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. प्रचारात एकमेकांविरोधात जोरदार टीकेच्या तोफा उडविल्यात. मात्र, ५२ जागांवर विजय मिळवून शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला तर ४२ जागा मिळवणारा भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यामुळे भाजपचे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

अधिक वाचा : केडीएमसीतील युतीचा सत्ता फॉर्म्युला, कोणाकडे किती वर्ष पदे? 

पालिकेत युती नसती झाली तर मनसेला अधिक महत्व प्राप्त झाले असते. ९+१ जागा मिळवणाऱ्या मनसेचे किंगमेकर होण्याचे स्वप्न हवेत विरले. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे ६, बसपाचा १ आणि ९ अपक्ष यांचेही सत्तेत सहभागी होण्याचे स्वप्नावर विरजन पडलेय.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल करताना शिवसेना आणि भाजपाकडून अगोदर स्वतंत्र अर्ज दाखल झाले. नंतर युतीची घोषणा झाली. वाटाघाटीत पहिले महापौरपद शिवसेनेला मिळणार असल्याने राजेंद्र देवळेकर यांचा मार्ग सुकर झाला आहे. भाजपातर्फे महापौरपदाकरिता अर्ज दाखल करणारे राहुल दामले हे अर्ज मागे घेतील, अशी अपेक्षा आहे. भाजपाकडून उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणारे विक्रांत तरे आणि विशाल पावशे यांच्यापैकी कोणाच्या गळात माळ पडते याकडे आता लक्ष लागलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.