औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड गावात एका शाळेत पहिलीच्या वर्गात चक्क टँक्टर घुसले.
नियंत्रण सुटल्यानं वाळूचा टँक्टर शाळेत घुसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून वर्ग सुरू असताना त्यात २२ विद्यार्थी होते.
हे सर्व २२ विद्यार्थी सुखरूप आहेत. ताबा सुटलेला टँक्टर सारा उर्दू स्कूल या माध्यमिक शाऴेत घुसला मात्र शाळेच्या भींतीवर आदळून वर्गातील बेंचला टँक्टर अडकल्यानं मोठी प्राणहाणी टळली..
रेतीची अवैध वाहतूक करणारा हा टँक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय..
मात्र टँक्टर अचानक घुसल्यानं विद्यार्थी सहित शिक्षकही घाबरले.. दरम्यान घटनेनंतर गाडीचा चालक फरार झाला.. पोलिस त्याचा शोध घेत आहेत..
पाहा फोटो
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.