दोन कुटुंबाच्या वादात नागपूर नॅशनल हायवेची वाहतूक खोळंबली

फारच विचित्र आणि धक्कादायक प्रकार आज नागपूरजवळील पवनी गावात घडलाय. दोन कुटुंबाचा वाद इतका विकोपाला गेला की, नागपूर नॅशनल हायवे -७ ची वाहतूकच खोळंबली.

Updated: Jul 16, 2014, 08:27 PM IST
दोन कुटुंबाच्या वादात नागपूर नॅशनल हायवेची वाहतूक खोळंबली title=

नागपूर: फारच विचित्र आणि धक्कादायक प्रकार आज नागपूरजवळील पवनी गावात घडलाय. दोन कुटुंबाचा वाद इतका विकोपाला गेला की, नागपूर नॅशनल हायवे -७ ची वाहतूकच खोळंबली.

नागपूरजवळील पवनी गावांत यादव आणि गुप्ता कुटुंबातला वाद विकोपाला गेला. यादव कुटुंबानं धनेश गुप्ता नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला. त्यानंतर संतापलेल्या गुप्ता कुटुंबाच्या घराची तोडफोड केली. त्यामुळं परिस्थितीला हाताळतांना पोलिसांनी सौम्य लाठीमार केलाय. 

घटना इतकी मोठी झाली की, लोक रस्त्यावर उतरले, टायर जाळले... त्यामुळं नागपूरच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-७ वरील वाहतूक खोळंबली आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

दरम्यान, धनेश गुप्ताची प्रकृती सध्या गंभीर आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.