औरंगाबाद : एकनाथ खडसे काल अजित पवारांसारखे बोलले, आज ते शरद पवारांसारखे बोलतायत, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे.
शेतकरी मोबाईलचं बिल भरतात, मग वीजेचं का नाही?, असा सवाल केला होता, यावर सर्व स्तरातून जोरदार टीका झाली. उद्धव ठाकरे यांनीही एकनाथ खडसे आता अजित पवारांप्रमाणे बोलायला लागले असल्याचं म्हटलं होतं.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवर एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे. उद्दव यांचं नाव न घेता एकनाथ खडसे यांनी म्हटलंय, भूईमूगाच्या शेंगा कुठे लागतात, हे ज्यांना माहित नाही, त्यांनी मला शिकवू नये.
एकनाथ खडसे यांच्या या पलटवारला उद्धव ठाकरे यांनी व्यवस्थित उत्तर देत, काल खडसे अजित पवारांप्रमाणे बोलले होते, आज ते शरद पवारांसारखे बोलतायत, शरद पवारांनाही बाळासाहेबांनी उत्तर दिलं होतं, पण मी देणार नसल्याचं उद्धव यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दुष्काळाचा दोन दिवसीय दौरा केला. यात त्यांनी दुष्काळ बघवत नसल्याचं म्हटलंय, तसेच आपल्याला शेतकऱ्यांशी भेटल्यानंतर दुष्काळाची भयानकता जाणवते, सरकारने याविषयी तातडीची पावलं उचलण्याची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.