नागपूर : मुंबईतल्या एलफिनस्टन स्टेशनचं नाव बदलून आता प्रभादेवी करण्यात करण्याच्या प्रस्तावाला आज विधानसभेत मंजूरी देण्यात आली.
आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. सकाळी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मंजूरी दिल्यावर आज हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला.
त्याचप्रमाणे मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्याच्या प्रस्तावालाही सभागृहानं मंजुरी दिली.