वसई : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान वसईत मुसळधार पावसाला सुरुवात झालीय, याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यताय, पावणेसात लाख मतदारांसाठी जवळपास ६०७ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २ हजार पोलिस कर्मचारी आणि २ दंगल नियंत्रण पथकं बंदोबस्तासाठी तैनात आहेत
शिवसेना, भाजप आणि जन आंदोलन पक्ष या तीनही पक्षांना बहुजन विकास आघाडीचं तगडं आव्हान आहे. एकूण ३६७ उमेदवार या निवडणुकीत आपलं नशीब आजमवत आहेत.
५०% आरक्षणामुळे ५८ वॉर्ड महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. १६ जूनला निवडणुकीचा निकाल लागणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सहारियांनी सांगितलं आहे.
वसई-विरार महानगरपालिकेत २६ वॉर्ड वाढवण्यात आल्यामुळे आता ही निवडणूक ११५ वॉर्डमध्ये रंगणार आहे. ज्यांपैकी ४ उमेदवारांची आधीच बिनविरोधी निवड झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.