जलसंपदा विभागानं पुणे मनपाचा पाणी पुरवठा केला बंद

 जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा थांबवला आहे. कोणतीही सूचना न देता जलसंपदा विभागानं पाणी पुरवठा बंद केला आहे.

Updated: Nov 30, 2016, 04:50 PM IST
जलसंपदा विभागानं पुणे मनपाचा पाणी पुरवठा केला बंद title=

पुणे :  जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा थांबवला आहे. कोणतीही सूचना न देता जलसंपदा विभागानं पाणी पुरवठा बंद केला आहे.

पुण्यात बाराशे एमएलडीपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचा ठपका ठेवत जलसंपदा खात्यानं ही कारवाई केली आहे, मात्र हा आरोप खोटा असून राजकीय सुडापोटी पालकमंत्री गिरीष बापट यांनी ही कारवाई केल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी केला आहे. त्यामुळं पुण्याच्या पाण्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.