बनावट नोटाप्रकरणी पकडलेला राष्ट्रवादीचा छबू नागरे नक्की कोण?

नाशिकमध्ये बनावट नोटा बनविणारे रॅकेट नाशिक पोलीस आणि आयकर विभाग यांच्या संयुक्त कारवाई मध्ये उघडकीस आलाय.

Updated: Dec 23, 2016, 08:31 PM IST
बनावट नोटाप्रकरणी पकडलेला राष्ट्रवादीचा छबू नागरे नक्की कोण?  title=

नाशिक : नाशिकमध्ये बनावट नोटा बनविणारे रॅकेट नाशिक पोलीस आणि आयकर विभाग यांच्या संयुक्त कारवाई मध्ये उघडकीस आलाय. त्यांच्याकडून तब्बल 2 कोटी 35 लाख रुपयांच्या बनावट नोटा तर 1 लाख 80 हजार रुपयाच्या जुन्या 500 आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्यात.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकरी आणि भुजबळ यांचा कट्टर समर्थक छबू नागरे नाशिकमधील वादग्रस्त घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील अशांचा समावेश आहे.

कोण आहे छबू नागरे?

छबु नागरे हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा माजी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा माजी शहराध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विद्यमान कार्यध्यक्ष पदाची जबादारी सांभाळत होता.

कोण आहे रामराव पाटील?

रामाराव पाटील राष्ट्रवादी कॉंग्रसचा एकेकाळचा पदाधिकारी आहे. मात्र गेल्या काही दिवापासून सक्रीय नाही. प्रदेश स्तरावरील वरिष्ठ नेत्यांच्या कायमच संपर्कात राहणारा आहे. नाशिकचा घंटागाडी ठेका त्याने घेतला होता. कायमच वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून रामराव पाटील चर्चेत असतो.