वेगळ्या विदर्भावरून रावसाहेब दानवेंचं शिवसेनेला आव्हान

स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा आणि शुक्रवारी विधीमंडळात त्यावरुन झालेल्या गदारोळानंतरही, भाजप स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर ठाम आहे.

Updated: Jul 30, 2016, 09:14 PM IST
वेगळ्या विदर्भावरून रावसाहेब दानवेंचं शिवसेनेला आव्हान  title=

शिर्डी : स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा आणि शुक्रवारी विधीमंडळात त्यावरुन झालेल्या गदारोळानंतरही, भाजप स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर ठाम आहे. योग्य वेळ आल्यावर महाराष्ट्र राज्याचं विभाजन करणार असल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिर्डीत म्हंटलं आहे. 

शिवसेनेचा विरोध असला तरी महाराष्ट्राचं विभाजन करणारच, असा दावा रावसाहेब दानवेंनी केला आहे. वेगळ्या विदर्भाला भाजपाचा पाठींबा आहे. छोटं राज्य प्रशासनाच्या दृष्टीनेही फायदेशीर असल्याचं दानवे म्हणाले. त्याचवेळी राजकारण डोळ्यासमोर ठेवून विभाजन करण्याला भाजपचा विरोध असल्याचाही त्यांनी खुलासा केला.