उष्माघातानं नवविवाहितेचा मृत्यु

यवतमाळ जिल्ह्यातल्या गवंडी गावात उष्माघातामुंळ एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.

Updated: Apr 28, 2017, 09:15 AM IST
उष्माघातानं नवविवाहितेचा मृत्यु

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातल्या गवंडी गावात उष्माघातामुंळ एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.

रंजना सुरेश नानोटे यांचा १९ एप्रिलला विवाह झाला होता. दोन दिवसांपूर्वीच अक्षय्य तृतियेसाठी त्या माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र अचानक चक्कर येऊन पडल्या आणि त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. 

मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळंच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय.