तानाजी मालुसरेंची पाठ्यपुस्तकात चुकीची माहिती

(प्रताप नाईक, झी मिडीया) तानाजी मालुसरेंच्या शौर्याची आठवण म्हणून कोंढाणा किल्ल्याचं सिंहगड असं नाव ठेवण्यात आलं. गड आला पण सिंह गेला, ही म्हण त्यांच्या बलिदानाची साक्ष देणारी. पण नव्या पिढीला पाठ्यपुस्तकांमध्येच कसा चुकीचा इतिहास शिकवला जातोय.

Updated: Aug 25, 2016, 11:43 AM IST
तानाजी मालुसरेंची पाठ्यपुस्तकात चुकीची माहिती title=

कोल्हापूर : (प्रताप नाईक, झी मिडीया) तानाजी मालुसरेंच्या शौर्याची आठवण म्हणून कोंढाणा किल्ल्याचं सिंहगड असं नाव ठेवण्यात आलं. गड आला पण सिंह गेला, ही म्हण त्यांच्या बलिदानाची साक्ष देणारी. पण नव्या पिढीला पाठ्यपुस्तकांमध्येच कसा चुकीचा इतिहास शिकवला जातोय.

तानाजी मालुसरे यांचं टोपणनाव सिंह होतं... त्यांच्या सन्मानार्थ सिंहगड किल्ल्याचं नाव ठेवण्यात आलं. ICSF च्या पाठ्यपुस्तकातला हा उल्लेख पाहून कपाळावर हात मारून घेण्याची वेळ पालकांवर आलीय. 

डॉ. मंजुशा संजय स्वामी यांनी लिहिलेल्या आणि न्यू सरस्वती हाऊसनं प्रकाशित केलेल्या सप्तरंग या मराठी पुस्तकात हा उल्लेख आहे. पाठ्यपुस्तकांमधूनच चुकीचा इतिहास कसा शिकवला जातोय, याचं हे ढळढळीत उदाहरण... त्यामुळं सहावीत शिकणा-या जान्हवी नीलिमा श्रतुराजसारख्या मुलांचा गोंधळ उडतोय.

जान्हवीच्या पालकांनी ही चूक प्रकाशकांच्या निदर्शनास आणली. तेव्हा प्रकाशकांनी आपली जबाबदारी झटकली आणि सगळं खापर लेखिकेवर फोडलं.

आपण बालवयात जे शिकते, ते ज्ञान आयुष्यभर लक्षात ठेवतो. आता पाठ्यपुस्तकांमधूनच अशी इतिहासाची चिरफाड होत असेल तर अशा दोषी व्यक्तींवर कारवाई होणार की नाही, असा सवाल केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज असते तर या लेखिकेचे आणि प्रकाशकाचे हात नक्कीच कलम केले असते.