हिंगोलीत तरुणावर तलवारीने सपासप वार

वसमतमध्ये तरुणावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. वसमतच्या गणेशपेठ परिसरातील ही घटना घडली.

Updated: Dec 18, 2015, 10:36 AM IST
हिंगोलीत तरुणावर तलवारीने सपासप वार  title=

हिंगोली : वसमतमध्ये तरुणावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. वसमतच्या गणेशपेठ परिसरातील ही घटना घडली.

अंधारात दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांकडून हा हल्ला करणयात आला. चाकू आणि तलवारीच्या सहायाने हातावर आणि पाठीवर सपासप वार केलेत. यात २५ वर्षीय विनायक सातपुते हा तरुण गंभीर जखमी झाला.

विनायकने घराचा आसरा घेतल्याने त्याचे प्राण वाचले. पुढील उपचारासाठी विनायकला नांदेडला हलविण्यात आलेय. वसमतमध्ये गावगुंडाची दादागिरी वाढल्याचे दिसत असून ही घटना पूर्व वैमनश्यातून घडल्याची चर्चा आहे.