झी २४ तास इम्पॅक्ट : बोगस डिग्री प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक

संपूर्ण राज्यात हाहाकार माजविणाऱ्या बोगस डिग्री रॅकेटचा पर्दाफाश झी २४ तासने केल्यानंतर, यात नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून याप्रकरणातील प्रमुख आरोपी शिवहरी लोडेला अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.

Updated: Dec 2, 2016, 08:38 PM IST
झी २४ तास इम्पॅक्ट : बोगस डिग्री प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक  title=

नागपूर : संपूर्ण राज्यात हाहाकार माजविणाऱ्या बोगस डिग्री रॅकेटचा पर्दाफाश झी २४ तासने केल्यानंतर, यात नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून याप्रकरणातील प्रमुख आरोपी शिवहरी लोडेला अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.

बोगस डिग्री विक्रीच्या या गोरखधंद्यात लोडे आणि त्याचा साथीदार डॉ राम पवार सहभागी होते. न्यायालयातून अंतरीम जमानत घेतल्याने पवारला अटक झाली नसली तरीही लोडे-पवार च्या या जोडीने आजवर राज्यातील अनेक तरुणांना या प्रकारे बोगस डॉक्टरची डिग्री विकल्याचा संशय नागपूर पोलिसांना आहे. 

वैद्यकीय प्रशिक्षण किंवा परवाना देण्याचा कुठलाही अधिकार किंवा कसलीही तरतूद यांच्याकडे नसल्याचे पोलिसांनी 'झी २४ तास'ला सांगितले.