नागपूर : वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेल्या राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर राबविण्यात येणार असल्याची माहिती, नागपूर पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेश यांनी दिली.
आतापर्यंत आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांसाठी अशाप्रकारच्या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत होतं.
मात्र प्रथमच राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. ४ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.