'त्या' कार्यकर्त्यांची हाकालपट्टी- मुनगंटीवार

तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांची गय केली जाणार नाही. त्यांची पक्षातून हाकालपट्टी केली जाईल, असे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Updated: Jan 13, 2012, 05:05 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांची गय केली जाणार नाही. त्यांची पक्षातून हाकालपट्टी केली जाईल, असे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

शिवसेना-भाजपा-आरपीआय जागा वाटपात मित्र पक्षाला भाजपाची जागा दिल्याने संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाचे चेंबूर येथील कार्यालय फोडले होते. त्याबाबत  सुधीर मुंनगुटीवार यांनी बोलताना हा इशारा दिला. ज्यावेळी मित्र पक्षांसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून निर्णय होतो. तो बंधनकारक असतो. राजकारणात सर्वांनाच न्याय देता येत नाही. हेही पाहिले पाहिजे. कार्यालयाची तोडफोड करणे योग्य नाही. यामध्ये जे आहेत, त्यांची पक्षातून हाकालपट्टी केली जाईल, असे  यांनी मुनगंटीवार सांगितले.

 

 

दरम्यान,  वरळीच्या वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये असात प्रकार काल घडला. हा वॉर्ड शिवसेनेसाठी राखीव झाल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड आणि जाळपोळ करत नाराजी व्यक्त केली. शिवसेनेतून भाजपामध्ये आलेले प्रकाश पवार हे या वॉर्डातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळी हा वॉर्ड भाजपाने शिवसेनेसाठी सोडल्याने भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

या वॉर्डातून गेल्यावेळी छोटू देसाई हा निवडून आला होता. भाजपा कार्यकर्त्यांनी छोटू देसाईचा पुतळाही जाळला. हे शिवसेनेचं षडयंत्र असल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे या  कार्यकर्त्यांवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.