अंडी, चिकन महागणार

मांसाहारी लोकांसाठी एक वाईट बातमी आहे. अंडी आणि चिकनचे भाव आता वाढणार आहे. दुष्काळामुळे कोंबड्यांच्या खाद्याच्या किमती वाढल्यामुळे त्याचे परिणाम चिकन आणि अंडी यांच्या उत्पादनांवरही होणार आहेत.कोंबड्यांचं खाद्य 70 टक्क्यांनी महागलं आहे.

Updated: Jul 31, 2012, 08:02 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मांसाहारी लोकांसाठी एक वाईट बातमी आहे. अंडी आणि चिकनचे भाव आता वाढणार आहे. दुष्काळामुळे कोंबड्यांच्या खाद्याच्या किमती वाढल्यामुळे त्याचे परिणाम चिकन आणि अंडी यांच्या उत्पादनांवरही होणार आहेत.कोंबड्यांचं खाद्य ७० टक्क्यांनी महागलं आहे. यामुळेच कोंबडीपासून मिळणारे पदार्थ महागणार आहेत.

 

देशभरात पावसाच्या आभावामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे कंबड्यांचे खाद्य असणारं सोयाबीन, मक्याचं दळण इत्यादी धान्यांचं उत्पादन कमी झालं आहे. यामुळेच कोंबड्यांचं खाद्य ७० टक्क्यांनी महागलं आहे. अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी याचा परिणाम अंडी आणि चिकनवर होणार असल्याचा इशारा दिला आहे.

 

मुंबईत चिकनचे भाव प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या रिटेल बाजारात ८० रुपये तर होलसेल बाजारात प्रतिकिलो चिकनचा दर ७० रुपये आहे. अंड्यांचे दरही वाढणार असून सध्या एक डझन अंड्यांसाठी ३६ ते ४० रुपये मोजावे लागतात. लवकरच डझनमागे ५ ते १० रुपयांनी वाढणार आहेत. त्यामुळे ही किंमत ५० ते ६० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.