आठवलेंना केले 'राजी' दूर झाली 'नाराजी'

आरपीआय नेते रामदास आठवलेंची नाराजी अखेर दूर झाली आहे. मुंबई महापालिकेच्या निकालापासून सुरु झालेली नाराजी, राज्यसभेच्या निवडीनंतर उघड झाली होती. गेल्या काही दिवसात आठवले शिवसेनेवर नाराज असून ते महायुतीतून बाहेर जाणार असल्याच्या शक्य़ता वर्तवण्यात येत होत्या.

Updated: Apr 3, 2012, 04:36 PM IST

www.24taas.com, मुंबई

आरपीआय नेते रामदास आठवलेंची नाराजी अखेर दूर झाली आहे. मुंबई महापालिकेच्या निकालापासून सुरु झालेली नाराजी, राज्यसभेच्या निवडीनंतर उघड झाली होती. गेल्या काही दिवसात आठवले शिवसेनेवर नाराज असून ते महायुतीतून बाहेर जाणार असल्याच्या शक्य़ता वर्तवण्यात येत होत्या.

आता मात्र आठवले यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. 2014 च्या निवडणूकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेपासून दूर खेचणं हेच आपलं लक्ष्य असल्याचं सांगतानाच आघाडीचा पराभव अटळ असल्याचं आठवले य़ांनी सांगितले.

आरपीआय़च्या लोणावळ्यातल्या शिबिरात ते बोलत होते. मात्र आठवलें य़ांची नाराजी कोणी आणि नेमक्या कुठल्या कारणांनी दूर करण्यात आली याबद्दल आठवले यांना विचारलं असता त्यानी त्या प्रश्नाला बगल दिली आहे.