'कृपां'ची चौकशी सुरूच राहणार

कृपाशंकर सिंहांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांची चौकशी सुरूच राहणार आहे. कृपाशंकर सिंहांची सगळी मालमत्ता जप्त केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात देण्यात आली.

Updated: Mar 14, 2012, 05:18 PM IST

www.24taas.com,  मुंबई

 

 

कृपाशंकर सिंहांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांची चौकशी सुरूच राहणार आहे. कृपाशंकर सिंहांची सगळी मालमत्ता जप्त केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात देण्यात आली.

 

 

चौकशी पूर्ण होईपर्यंत कुठलीही मालमत्ता विकणार नाही, असं प्रतिज्ञापत्र कृपाशंकर सिंहांनी कोर्टात सादर केलंय. हायकोर्टानं कृपांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आणि संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कृपांविरोधात गुन्हे दाखल झाले आणि त्यांच्या मुंबईतल्या मालमत्तांवर छापासत्र आणि जप्तीचं सत्रही पार पडलं. मात्र अजूनही कृपाशंकर सिंह यांना अटक झालेली नाही. सुप्रीम कोर्टानंही कृपांना दणका दिल्यानंतर आतातरी कृपांना अठक होणार का, हा खरा प्रश्न आहे.

 

 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील दोन घरांवर  आणि ऑफिसवर छापा  मारला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हा मारला छापा मारला आहे. दरम्यान, कृपाशंकर यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी होणार  झाली.

 

ऑफिसमधील काही कागदपत्रं जाळण्यात आल्याचा आरोप होत होता. आज सकाळी बांद्रामधील साई प्रसाद आणि पार्ला येथील घर आणि ऑफिसवर टाकले छापे टाकले. त्यानंतर  आर्थिक गुन्हे शाखेने आपला मोर्चा वसईकडे वळवला आहे.  वसईतील त्यांच्या जावयाच्या एका घरावर छापा मारला आहे. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलीस कृपाशंकर सिंह यांच्या घरांची झडती घेत आहेत. कागदपत्र लपविण्याचा प्रकार सुरू असल्याने हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. तसेच  कृपाशंकर सिंह हे कुटुंबासह अज्ञातवासात आहेत. त्यांना  बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी केव्हाही अटक होण्याची शक्यता असल्याने ते अज्ञातवासात गेले होते.

 

संबंधित आणखी बातम्या

 

कृपाशंकर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव!

 

कृपाशंकरांनी मालमत्तेचे कागदपत्र जाळले?

 

कृपाशंकर सिंहांना केव्हाही होऊ शकते अटक

 

अटकेमुळे घाबरून ‘कृपाशंकर पळाले’?

 

 कृपाशंकर सिंहांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल