राज्यातला अंधार अगोदर दूर करा नंतर वाटेल तर रोजगार हमी योजना खातं राष्ट्रवादीनं स्वतःकडं घ्यावं अशी खरमरीत टीका रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी केली. जयराम रमेश यांनी मुख्यमंत्र्यांना रोहयो योजनेच्या अंमलबजावणीविषयी लिहलेल्या पत्रासंदर्भात ते बोलत होते.
रोहयो खात्याचं काम अगदी सुरळीत सुरु असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांना राज्यातील काही नेत्यांनी भेटून रोहयोच्या कामाबद्दल दिशाभूल करणारी माहिती दिल्य़ाचा राऊत यांनी आरोप केलाय.या माहितीमुळे जयराम रमेश यांनी रोहयो खातं ग्रामविकास खात्याकडं वर्ग करावं असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं. या प्रकारामुळं नितीन राऊत संतप्त झाले आहेत. राऊत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याचं थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या बोलण्याचा रोख राष्ट्रवादीच्या नेत्यांकडंच आहे.