www.24taas.com, मुंबई
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या आजच्या दुस-या दिवसाच्या बैठकीला कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हजर झालेत. बैठकीत जाण्यापूर्वीच त्यांनी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवलाय.
नरेंद्र मोदींना भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करा अशी मागणीही त्यांनी केली. तर याच निमित्ताने येडियुरप्पा यांनी आपले अंतर्गत विरोधक अनंतकुमार यांच्यावरही निशाणा साधलाय. तर दुसरीकडे आजच्या सभेला ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी येणार नाहीत. येडियुरप्पा कार्यकारणीच्या बैठकीला आल्यामुळं अडवाणी नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षानं मात्र आधीच ठरल्याप्रमाणे अडवाणी आजच्या सभेला येणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
नरेंद्र मोदी नाराज असल्यामुळं पक्षाच्या बैठकीला येणार नव्हते. संजय जोशींचा राजीनामा घेतल्यानंतरच मोदी बैठकीला हजर राहिले. आता नाराज नेते बैठकीला हजर राहिल्यानं आजच्या चर्चेकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.