सोन्याला झळाळी, २८ हजार तोळे

सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा उसळी मारत २८ हजार रुपयांचा टप्पा पार केला.

Updated: Nov 8, 2011, 12:14 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

गेल्या काही दिवसांत २६ ते२७ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम (तोळे) या किमतीत मिळणा-या सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा उसळी मारत २८ हजार रुपयांचा टप्पा पार केला. साठेबाज आणि सणासुदीसाठी किरकोळ ग्राहकांची खरेदी वाढवल्याने सोने दरात वाढ झाली.

 

लग्नसराई आणि सणासुदीमुळे दागिन्यांची खरेदी होत आहे. शिवाय गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीच्या नाण्यांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली. दरम्यात, चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. स्टँडर्ड सोने२०० रुपयांनी वाढून २८,१०० रुपयांवर पोहोचला तर प्युअर सोने १०० रुपयांनी वाढून२८,३००0 रुपयांवर गेला.