ठाणे: मुंबई महानगरपालिकेची ७२ इंच व्यासाची जलवाहिनी वागळे इस्टेट परिसरात फुटली. या घटनेमुळं पाण्याची मोठ्याप्रमाणात नासाडी झाली असून संपूर्ण परिसर जलमय झाला होता. ही जलवाहिनी जुनी झाल्यानं पाण्याच्या दबावानं फुटल्याचं बोललं जातंय.
दरम्यान पाइपलाइन दुरुस्तीचं काम संपेपर्यंत मुंबईमध्ये २० टक्के पाणी कपात करण्यात आलीये. आज रात्रीपर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण होईल अशी माहिती पालिकेच्या पाणीपूरवठा विभागाच्या अभियंत्यांनी दिलीये. या घटनेत चाळीस वर्षाचा एक इसम किरकोळ जखमी झाला आहे.
जलवाहिनीच्या लगतच असलेल्या झोपडपट्टीतील अनेकांच्या घरात हे पाणी शिरलं होतं. यापरिसरात तब्बल दोन हजार घरं आहेत. महापालिकेच्या आपत्तकालीन विभागाला मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही गळती रोखण्यात त्यांना यश आलं. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.