दिनेश मौर्या,www.24taas.com, मुंबई
थर्टी फर्स्ट नाईट आली आहे आणि पुन्हा एकदा अंमली पदार्थांची तस्करी करणारे ड्रग्स तस्कर सक्रीय झाले आहेत. मुंबई, पुणे, नासिक सह गोव्यात ड्रग्स तस्करांनी आपलं जाळं पसरवलं आहे. तरूणाई ड्रग्सचा आहारी जाऊ नये यासाठी पोलीसांनी प्रयत्न सुरु केलं आहे.
एक अशी रात्र जेव्हा तरूणाई बेधुंद होउन नाचते, गाते..आणि नविन वर्षाचं स्वागत करते. मात्र, नवीन वर्षाचं आगमन साजरा करत असतांना ही तरूणाई स्वतःला अमली पदार्थांचा नशेत झोकून टाकते आणि तरूणांचा या वाईट सवईला कमाईचा धंदा बनवणारे ड्रग्स तस्कर पुन्हा एकदा एक्टीव झाले आहेत...मुंबईत गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सचा साठा ड्रग्स तस्करांचा या काळ्या धंद्याचा पर्दाफाश करत आहे. अंमली पदार्थ निरोधी पथकाने गेल्या काही दिवसात कोकेन, एम्फेटामाईन, चरस, हिरोईन, गांजा सारख्या अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय.
एकूण 14 कोटी रुपये किंमतीचा ड्रग्सचा साठा मुंबई एंटी नारर्कोटीक्स विभागाने जप्त केलाय. ड्रग्स तस्कारांसाठी मुंबई, पुणे, नासिक आणि गोवा ही मोठा बाजारपेठ आहे. फक्त एका रात्रीत कोट्यावधी रुपयांचा ड्रग्स विकला जातो. पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी कित्येक ड्रग्सचं कोड वर्ड ठेवण्यात आलं आहे..पोलीस हे कोड वर्ड्स ब्रेक करण्याच प्रयत्न करत आहे..थर्टी फर्स्ट नाइला ड्रग्स विकण्याचा तयारी असलेल्या अशा ड्रग्स तस्करांवर पोलीसांनी नजर ठेवायला सुरु केलं आहे..तरुण पिढींनी ड्रग्स आहारी जाउ नये असं आवाहन पोलीसांनी केल