मुंबई : मुंबईत जुहूच्या किनाऱ्यावर ३५ फूट लांबीचा अजस्त्र मासा मृत अवस्थेत वाहात आलाय. या माशाचं वजन अंदाजे २० टन आहे.
स्थानिकांनी हा मासा वाहून येताना पाहिला, तेव्हा तो जिवंत असावा असा संशय त्यांना आला. त्यामुळे परिसरामध्ये घबराट पसरली होती. मात्र कालांतरानं मासा मृत असल्याचं लक्षात आलं.
रात्री उशिरा हा मासा किनाऱ्यावर आला. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा ब्रुडी व्हेल जातीचा मासा आहे. तज्ज्ञांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं असून माशाचा मृत्यू कशामुळे झाला याचा आता शोध घेतला जाणार आहे.