मुंबई : मुंबईमध्ये 11 जुलै 2006 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाला दहा वर्ष पूर्ण झालीत. या दिवशी मुंबईची लाईफलाईन एकामागून एक झालेल्या साखळी स्फोटांनी हादरली होती.
मुंबईतल्या सात विविध ठिकाणी अकरा मिनिटांत लोकलमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात जवळपास 200 ठार तर 700 जण जखमी झाले होते.. या बॉम्बस्फोटांप्रकरणी गेल्या वर्षी पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मात्र आजही दहशतवादाची काळी छाया जगावर कायम आहे. देशाची आर्थिक राजधानीही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळं गेल्या दशकभरात काय बदललं असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.