गुड न्यूज: राज्यातील ५३ टोलनाक्यांवर टोलमाफी , १२ कायमचे बंद!

आज सर्वसामान्यांवर गुडन्यूजची खैरात झालीय. राज्यातील ५३ टोलनाक्यांवर खाजगी वाहनांना टोलमाफी. छोट्या गाड्या, जीप आणि एसटी बसला टोल नाही, तर १२ टोल नाके पूर्णपणे बंद कऱण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केलीय. राज्यात १ जूनपासून टोलमुक्ती लागू होणार आहे.

Updated: Apr 10, 2015, 06:25 PM IST
गुड न्यूज: राज्यातील ५३ टोलनाक्यांवर टोलमाफी , १२ कायमचे बंद! title=

मुंबई: आज सर्वसामान्यांवर गुडन्यूजची खैरात झालीय. राज्यातील ५३ टोलनाक्यांवर खाजगी वाहनांना टोलमाफी. छोट्या गाड्या, जीप आणि एसटी बसला टोल नाही, तर १२ टोल नाके पूर्णपणे बंद कऱण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केलीय. राज्यात १ जूनपासून टोलमुक्ती लागू होणार आहे.

कोल्हापूर टोलनाक्याबाबत ३१ मेपर्यंत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. तर ३१ जुलैपर्यंत मुंबई-पुणे हायवे टोलबद्दल निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच ही माहिती दिली होती. आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याची घोषणा केली. युती सरकारचा हा य़ंदाचा सर्वात मोठा निर्णय आहे. निवडणुकीदरम्यान राज्य टोलमुक्त करणार असं आश्वासन भाजपनं दिलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.